Breaking News

Tag Archives: विधान परिषद

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, आमदार आणि संरक्षक म्हणून जबाबदारी… विधिमंडळाच्या शतकोत्तरी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व केले आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, त्याच्या प्रशासकीय चौकटीत विकेंद्रित राजनैतिकता, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांचा समावेश करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व …

Read More »

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबईत रात्री मोठा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. काल रात्री मोठा पाऊस झाल्याने मुंबईतील …

Read More »

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे विधानपरिषदेत निवेदन

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून पात्र महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, …

Read More »

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणूकीत चुरसः १३ उमेदवारी अर्ज दाखल अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट झाला सावध

मागील काही वर्षात विधान परिषदेची निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडून पाळली जात आहे. मात्र यंदाच्या विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी बिनविरोध निवड होण्याऐवजी निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. या रिक्त ११ जागांसाठी १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील घोडेबाजाराला कोणत्या पक्षातील …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक निलंबनाची कारवाई नीलम गोऱ्हे यांनी जाहिर केल्यानंतर व्यक्त केली खंत

सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या …

Read More »

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित प्रसाद लाड-अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपा सदस्य प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात काल संध्याकाळी शाब्दीक बाचाबाची झाली. त्यावरून भाजपाच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर …

Read More »

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी भाजपाचे किरण शेलार यांचा पराभव झाला

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणूकांची मतमोजणी आज सोमवार, १ जुलै रोजी झाली. वृत्त लिहिपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे उबाठाचे उमेदवार अनिल परब यांनी भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा २६,०१२ मतांनी पराभव …

Read More »

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. …

Read More »

शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका

शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म (१८ वर्षे) पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपले तरुण …

Read More »