Breaking News

Tag Archives: वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेना सल्ला, जी चूक सोनिया गांधींनी केली ती करू नका

२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादीला लागू नये…

आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, संविधान जगातील पवित्र ग्रंथ, पण तोच बदलण्याची भाजपाची भाषा…

देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला, पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात. संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. …

Read More »

‘वंचित’ची २५ नोव्हेंबरच्या महासभेला राहुल गांधी यांना आमंत्रण

भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून येत्या २५ नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी याना देण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बॅलार्ड पिअर्स येथील वंचितच्या राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर …

Read More »

सुजात आंबेडकर यांचा इशारा, अधिवेशनावर सुशिक्षित बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार कंत्राटी नोकर भरतीवरून सुजात आंबेडकर आक्रमक

नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.तसेच शाळा खाजगकरणाच्या निर्णय घेतला गेला असून पेपरफुटी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका

एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

कॉफी गोड होती की कडू? प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी साखर टाकून…. राजकिय चर्चा कोणतीही झाली नाही

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांचे राजकिय वैर सर्वांना माहित आहे. मात्र आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील एका कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची मोठ्या वर्षाच्या अंतराने भेट झाली. मात्र या भेटीत महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम…अन्यथा ४८ जागा लढविणार इंडिया आघाडीने सात दिवसात निर्णय घ्यावा

सन २०१९ च्या लोकसभा ६.९८ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही, आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासंबधी काँग्रेसला रस आहे का, या संबधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची अपेक्षा आहे असे सांगत जर सात दिवसात …

Read More »

त्या व्हिडिओवर प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, सत्ता पिलीय? सत्तेबरोबर भ्रष्ट? की दोन्ही गोष्टी केल्यात

काल शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर होते. त्यामुळे नागपूरची चार तासाच्या ढगफुटी सदृष्य पावसाने तुंबई झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला जाता आले नाही. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरची पाहणी केली. यावेळी पावसामुळे झालेल्या …

Read More »