Breaking News

Tag Archives: महाविकास आघाडी

वंचितचा मविआला नवा प्रस्ताव २७ ठिकाणी तयारी, मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी?

राज्यात आणि देशात भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गटाच्या महाविकास आघाडीत सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडातील जागा वाटपाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना नवा प्रस्ताव दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जयंत पाटील यांचा फोन आला होता…त्यांना सांगितले

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी एक्सवरुन माध्यमांना सांगितले आहे. तसेच, …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन…

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळतं की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत मागणी केली. प्रकाश …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मविआत जागा वाटपावरून मतभेद ?, भाजपाला सत्तेतून हद्दपार…

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करु, …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, श्रीमंत शाहु महाराज हे राजकारणात… तर मराठा आरक्षणावर….

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भाजपाकडून पुन्हा एकदा एनडीएचा तर महाराष्ट्रात महायुतीचा आलाप आवळायला सुरु केले आहे. तर शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सध्या कोणत्या मुद्यावर भाजपाला रोखायचे आणि कोणाच्या हिश्याला किती जागा द्यायच्या यावरून अद्यापही चर्चेच्या फेऱ्या होत …

Read More »

संजय राऊत यांची टीका, आता अशोक चव्हाणही हात चिन्हावर दावा करणार का?

राज्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर खोचक टीका केली. यावेळी संजय …

Read More »

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला या दोन मुद्यांची भर घालत दिला मसुदा

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडली आहे. महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, …काँग्रेसच्या समावेशकतेवर प्रश्न

भाजपाला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता इंडिया आघाडी राहिली….

महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेलं आहे.त्याच्यामुळे, ताक जरी असले तरी फुकून प्यायचे हे मी ठरवलेले आहे.जागावाटप हा दुय्यम विषय आहे, प्रथम विषय हा आहे की, एक ‘किमान समान कार्यक्रम’ हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे. त्याची अर्धवट चर्चा झाली आहे, अर्धवट चर्चा सुरू असल्याचे वंचित …

Read More »