Breaking News

Tag Archives: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांचे आवाहन मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाचे आंदोलन मागे घेत इथे सलाईन लावून मरण्यापेक्षा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढून मरू असे सांगत मला तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा आहे. जर उद्या मला सरकारने तुरुंगात डांबले तर भाजपाची एकही सीट निवडून देऊ नका …

Read More »

जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचे भावनिक आवाहन, मला तुमची साथ हवीय राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा १३ जुलै पर्यंतची मुदतवाढ

मराठा आरक्षणप्रश्नावरून आता मराठा विरूध्द ओबीसी असा वाद निर्माण झाला असून मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या तयार करण्यात आलेल्या सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी १३ जुलै पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक …

Read More »

मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने येणा-या प्रश्नासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती निर्णय घेणार राज्य उत्पादन शुल्‍क मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती

मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. शासनाकडे आलेल्या सगेसोयरेच्या हरकतीबाबत सरकारचा निर्णय झाला का, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना शपथपत्र देवून त्यांना प्रमाणपत्र द्यावे, …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची नव्या मागणी; तर हाके म्हणतात मराठा आणि कुणबी वेगवेगळे आरक्षणाच्या प्रश्नावरून एकमेकांना आव्हान-प्रति आव्हान

काल अचानक मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृत्तीत सुधारणा झाल्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आणि मुस्लिम समुदायाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी नवी मागणी केली. त्यामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच दुसऱ्याबाजूला राज्यातील …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आंदोलनाला एक महिन्यासाठी स्थगिती सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची सरकारला एक महिना मुदत

मराठा आरक्षणप्रश्नी आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चवथ्या दिवसापासून ढासळायला सुरुवात झाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा आरोप, काँग्रेसने मराठा समाजाचा विश्वासघात केला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरून केला आरोप

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक असलेल्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारवर सातत्याने टीका करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसला दिला. मनोज …

Read More »

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, अन्यथा निवडणूकीत नावे घेऊन… सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील सगेसोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाट पाहिली. मात्र मार्च महिन्यात आचारसंहिता जारी झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी काही काळ मराठा आरक्षणाचे आंदोलन काही काळ स्थगित ठेवले. आता केंद्रात नवे …

Read More »

अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरावली सराटीत

राज्यातील सर्वाधिक चुरशीची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद (सुप्रिया सुळे)-भावजय (सुनेत्रा पवार) मधील निवडणूकीकडे सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पवार कुटुंबातील शरद पवार विरूध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. या लढतीच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे …

Read More »