Breaking News

Tag Archives: नांदेड

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही महायुतीचे सरकार येताच नांदेडमध्ये एमआयडीसी मंजूर करणार

महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील प्रचारसभेत दिली. …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेडच्या बसस्थानकाला भेट महिला प्रवाशांशी साधला संवाद महागाई आणि बेरोजगारी प्रश्न महिलांकडून उपस्थित

जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे या गोष्टी आताच्या राजकिय वर्तुळात दुरापास्त झाले आहे. त्यातच १२ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना तर आता जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, त्यांचा त्रास जाणून घेण्याचे तर आता विसरूनच गेले असताना काँग्रेस नेते तर राहुल गांधी हे मात्र संधी मिळेल तेव्हा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक …

Read More »

अमित शाह नंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही तोच आरोप, संविधानाच्या पुस्तकात कोरी पाने वंचितांचे अधिकार हिसकावून घेण्याचा काँग्रेस व इंडी आघाडीचा कट

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवेश झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील सभेत काँगेस विशेषतः राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेसकडून त्यांच्या कार्यक्रमात वाटण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तिकेत कोरी पाने असल्याचा आरोप केला. अगदी तोच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नांदेड पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण तर एमआयएमकडून इम्तियाज जलील स्व. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली आहे. विधानसभा निवडणूकीबरोबरच राज्यातील लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभा सदस्य राहिलेले वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे. नांदेडचे माजी काँग्रेस …

Read More »

भाजपाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. मिनल पाटील खतगावकर व भाजपाचे शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये

भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, नांदेड जिल्ह्यातील कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

नांदेडमध्ये आयकर विभागाला धाडीत मिळाली १४ कोटी रूपयांची रोकड, ८ किलो सोने

आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील नांदेडमधील फायनान्स कंपन्यांवर ७२ तासांच्या छाप्यानंतर १४ कोटी रुपये रोख आणि ८ किलो सोन्यासह १७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली. भंडारी फायनान्स आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या परिसरातून रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेली संपूर्ण रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, आमदार विकत घ्यायला पैसै, मात्र रूग्णालयासाठी पैसे नाहीत नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यूवरून सरकारला करून दिली आठवण

राज्यातील दोन तीन जिल्ह्यात मृत्यू संख्या वाढल्याचे दिसत होत त्याला काही कारण असू शकतात पण यात राजकारण न करता मार्ग काढावे लागतील. हेच डीन, डॉक्टर, नर्स असताना कोरोना काळात जगाने आपल कौतुक केले. हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. काय कमी राहत आहे याची कारणं शोधावे लागेल असे युवासेना नेते आदित्य …

Read More »

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र …

Read More »