Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, निवारा केंद्रांमध्ये सुविधा द्या 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नाशिक, छ, संभाजीनगर, सोलापूरात कांदा महाबँक सुरु करा अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज

राज्यातील मुंबईसह पुणे रायगडसह जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून आणि पहाटेपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर सखल भागात पाऊसाचे पाणी जमा झाले. तर अनेकांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. तर अनेक नदी-नाले तुडूंब भरून वाहु लागले. शिवाय अनेक भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नदी-नाल्याच्या पुलावरून पाणी भरून वाहु लागल्याने अनेक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती

देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सह्याद्री …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …

Read More »

दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ …

Read More »

आधीची आश्वासने हवेत आता आशा सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविकांना विमा कवच अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रूपयांचे विमा

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी …

Read More »

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्यांची मुदत मराठा विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना अनुभव नसलेल्या चड्डा या बिल्डरच्या घशात ४००

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या …

Read More »