Breaking News

Tag Archives: अजित पवार

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही बीडच्या सभेत जयंत पाटील यांची ग्वाही

जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले …

Read More »

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, …आता माघार नाही ज्यांच्याकडून शिकला त्यांच्याबद्दल योग्य भावना ठेवा नाहीतर जनता योग्य जागा दाखवेल अजित पवार गटाला यांना टोला

आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून …

Read More »

संजय राऊत अजित पवारांबद्दल म्हणाले… राष्ट्रवादीतील घडामोडींवर संजय राऊत यांनी केले भाष्य

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यामुळे महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आपण महाविकास आघाडी सोबत की भाजपासोबत या विषयी शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले. तसेच बीडमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची आज जाहिर सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेतील फुटीनंतर संजय …

Read More »

शरद पवार यांचा तो इशारा आणि बीडमधील धनंजय मुंडे समर्थकांची कबुली त्या बॅनरवरून रंगली चर्चा

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्या ते बीड येथे स्वाभिमान सभेला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांचा हा पहिलाच मराठवाडा दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, …पण आमच्या नात्यांमधला ओलावा कमी झाला नाही पवारांची बहिण एन.डी.पाटील यांच्या पत्नी

आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन डी पाटील यांच्या पत्नी या पवारांच्या बहिण आहेत.मात्र तरीही एनडी पाटील अनेकदा पवारांच्या विरोधातही ते वैचारिक मतभेद होते. मात्र आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित दादा आणि पवार साहेब यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा …

Read More »

राज ठाकरे यांचा भाजपासह अजित पवारावर साधला निशाणा, आधी पक्ष बांधायला शिका… पक्ष फोडाफोडीवरून भाजपावर तर भाजपासोबत गेल्याने गाडीमध्ये झोपून जावं लागतय

काही दिवसांपूर्वी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी एका टोल नाक्यावर अडवल्यानंतर मनसैनिकांनी नाशिकजवळील टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर टीका करताना भाजपाच्या नेत्यांनी कधीतरी रस्ते आणि टोल नाकेही बांधायला शिका,असा खोचक सल्ला मनसेला दिला होता. या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या …

Read More »

‘अभंग एकविशी’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन 'अभंग एकविशी' पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावाचे, सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील - उपमुख्यमंत्री अजित पवार

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी-तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा विश्वास, दिल्ली समोर महाराष्ट्रा कधीही झुकणार नाही दिड वर्षात अद्यापही महापालिका निवडणुका का घेतल्या नाही?

आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण मुंबई विभाग कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्यासह सेवा दलाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी …

Read More »