Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ५४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ …

Read More »

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने …

Read More »

लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारपर्यंत १९ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण ४५० मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना …

Read More »

१०५ लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्राथमिकता कोणत्या मुद्यांना लोकनीती प्री-पोल सर्व्हेत दिली कारणे

मागील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. त्यावेळी देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. यातील पहिल्या टप्प्यात देशातील १०५ या सर्वात मोठ्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावला. तसेच या १०५ मतदारसंघातील उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १९ एप्रिल रोजी मतदान …

Read More »

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड आणि बारामतीचे मतदान होणार असून उद्या या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. …

Read More »