Breaking News

Tag Archives: धनंजय मुंडे

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी धनंजय मुंडे तर प्रदेश प्रवक्ते राजेश विटेकर यांची नियुक्ती २२ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अजित पवार दौऱ्यावर-सुनिल तटकरे यांची माहिती

सोमवारी २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजित पवार …

Read More »

धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती… ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. तसेच खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “सिबील स्कोअर’ ची सक्ती बँकाना करता येणार नाही राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत वार्षिक पत आराखडा सादर

शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, पीक …

Read More »

ओबीसी आंदोलन स्थगित पण छगन भुजबळ यांचा इशारा, … जमाना जानता है की हम… इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही

ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही. आरक्षणाच्या लढ्यासाठी हे दोन वाघ आपल्याला यापुढेही आवश्यक आहे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी आपल्या सोबत आहे. मात्र यापुढील काळात आरक्षणाच्या या लढाईत आपण सर्व एकत्र राहिलात तरच आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे आपापसात न लढता एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे सांगत इतर मागासवर्गीयांच्या …

Read More »

धनंजय मुंडे यांचे आदेश, जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटप करा खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्जाचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …

Read More »

धनंजय मुंडे यांचे आवाहन, सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपायची जबाबदारी प्रत्येकाची निवडणुकीत जय-पराजय होत असतात; सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला; विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष …

Read More »