माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचे वृत्त पुढे आले. डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने एक मितभाषी राजकारणी कालाच्या उतरात गडप झाल्याची भावना सर्वचस्थरातील राजकारण्यांनी व्यक्त केली. दरम्यान आज डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन घेत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांना आदरांजली वाहिल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने एक्स X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी सोशल मीडियावर “महान पंतप्रधान, अर्थमंत्री आणि जागतिक राजकारणी असलेल्या डॉ मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली ज्यांनी धाडसी आर्थिक सुधारणांद्वारे भारताचे हित जपले आणि भारताला जगामध्ये योग्य स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आर्थिक संकटानंतर जागतिक स्थळावर अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यात मोलाची भूमिका बजवाली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (९२) यांचे गुरुवारी (२६ डिसेंबर २०२४) निधन झाले.
राजस्थानचे प्रतिनिधीत्व करणारे राज्यसभेचे सदस्य म्हणून डॉ. सिंह यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. याआधी त्यांनी १९९१ पासून सहा वेळा राज्यसभेत आसामचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.
राज्यसभेत त्यांच्या शेवटच्या दिवशी कौतुकाचा वर्षाव करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना “प्रेरणादायी उदाहरण” म्हटले होते.
देश के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी के आवास पर गृह मंत्री @AmitShah जी ने भावभीनी श्रद्धांजलि दी।
📍 नई दिल्ली pic.twitter.com/06Rzm7M5o9
— Congress (@INCIndia) December 27, 2024
“डॉ मनमोहन सिंग यांनी ज्या प्रकारे देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले… जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीचा उल्लेख केला जाईल तेव्हा ते त्या मोजक्या सन्माननीय सदस्यांपैकी एक असतील ज्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील,” अशी भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान डॉ मनमोहन सिंह यांच्यावर उद्या शासकिय इतमामात त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
देश की महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी ने पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी के आवास पहुंचकर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की।
📍 नई दिल्ली pic.twitter.com/j3X5kMrSSu
— Congress (@INCIndia) December 27, 2024
Marathi e-Batmya