मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आज दोन महिने झाले. या दोन महिन्यांनंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे की नाही असा संशय निर्माण होत आहे. जे दोन मोबाईल मिळाले, त्या मोबाईलमधून डेटा रिट्राईव्ह करण्यात आला की नाही की त्यात मोठ्या नेत्याचा आवाज असल्याने त्या मोबाईलबाबतची माहिती लपविली जातेय अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक्सवर एक व्हिडिओ अपलोड करत त्या माध्यमातून व्यक्त केली.
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, संतोष देशमुख यांची हत्या ज्या निघुर्णपणे झाली तसे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठीच बीडमध्ये सुरु असलेले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संगमताने झालेले जमिनीचे, राखेच्या विक्रीचे गैरव्यवहार आदी गोष्टी बाहेर काढल्या त्या त्यासाठीच बाहेर काढल्या. मात्र आज दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने दिलेली माहितीनुसार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई होण्याऐवजी या प्रकरणी काही लपवलं जातयं, कोणी तरी कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत असल्याचेही यावेळी सांगितले.
अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, आज सगळीकडून धनंजय मुंडे यांना अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस हे वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल करत त्यासाठी ते निर्णय घेण्यातही एकमेकांवर टोलवा टोलवी करताना दिसून येत आहेत असेही यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, जी काळी स्कॉर्पिओ गाडी मिळाली, त्या गाडीत दोन मोबाईल मिळाले, त्यावेळी अनेक माध्यमांनी अशी बातमी दाखविली की त्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळविण्यात येणार आहे. मात्र आज दोन महिने झाले तो डेटा अद्याप परत मिळविला की नाही याबाबत अद्याप कोणतीच माहिती पुढे आली नाही. त्याचबरोबर त्यामधील एका फोनवर एका मोठ्या नेत्याचा फोनवरून संभाषण केल्याची बातमीही अनेक माध्यमांवर दाखविण्यात आली. मात्र तो नेता कोण, त्या बड्या नेत्याला वाचविण्यासाठीच यासंदर्भातील सगळी माहिती लपविली जात आहे का असा संशय निर्माण होत आहे. त्याचबरोबर ज्या अवादा कंपनीकडून खंडणीचा जो व्यवहार झाला तो व्यवहार शासकिय बंगल्यात झाला, तो म्हणजे सातपुडा बंगला. त्याची माहिती भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जाहिरसभांमध्ये दिली. मग त्या व्यवहारात धनंजय मुंडे हे ही सहभागी असल्याचे दिसतेय. मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवालही यावेळी केला.
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या आर्थिक हितसंबधाचे सर्व पुरावे पुढे आणूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. जो पर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत तपास यंत्रणांवर दबाव हा राहणार आहे. सर्व पुरावे पुढे आणूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात नाही. की केवळ ते धनंजय मुंडे यांचे मित्र असल्याने ते त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत असा सवाल उपस्थित करत या निमित्ताने आता देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे की असाच प्रश्न निर्माण होत असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्यासारखे दुसरे प्रकरण पुन्हा राज्यात घडू नये यासाठी हा लढा मी आणि आपण लढत आहोत. मात्र या संदर्भात राज्य सरकारकडूनच निर्णय घेण्याऐवजी त्या प्रकरणात टोलवा टोलवी करत असल्याचे दिसून येत आहे. एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांच्याकडे तर अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोणी काही तरी लपवतंय असा आरोपही यावेळी केला.
स्व संतोष देशमुख यांचा तपास योग्य होणार का? खूप काही लपवलं जातय अस वाटतंय
९ तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून २ मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फ़ोन आला होता अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेंसिक मधे पाठवण्यात आला होता, आता २… pic.twitter.com/A9Q42JUg5M
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 9, 2025
