Tag Archives: bjp

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का ? पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात

देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ८ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या आपल्या विधानाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी स्वदेशी तेजस …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, गरिबांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना सोडणार नाही प्रसंगी 'ईडी' कडे तपास देणार, १५ दिवसांत एसआयटी अहवाल

“नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’ कडे सोपवू,” असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज …

Read More »

गिरीष महाजन यांची माहिती, नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविणार मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. दिंडोरी येथे काल रात्री विहिरीत कार कोसळून ६ शालेय विद्यार्थासह …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची टीका, काँग्रेस आणि डावे पक्षच खोटे बोलण्यात पारंगत बनलेत भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, केरळ स्टोरीपासून ते धुरंधरपर्यंत सर्व काही खोटे ठरवत असले तरी, हे पक्षच “खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत.” केरळच्या तिरुवल्ला येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एलडीएफ आणि यूडीएफ खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत. …

Read More »

राहुल गांधी यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून विरुधार्थी मते व्यक्त अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावरून केली होती टीका

ऑपरेशन सिंदूर, इराणमधील युद्ध आणि एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसते. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मध्यपूर्वेतील युद्ध आणि भारतातील इंधन पुरवठ्याच्या परिस्थितीला हाताळण्याच्या मोदी सरकारच्या पद्धतीवर राहुल गांधींपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल …

Read More »

राघव चड्ढा यांचा त्यांच्याच आप नेत्यांना इशारा, ‘घायल हूँ, इसलिये घातक हूँ आप नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवरून दिला इशारा

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील उपनेतेपदावरून हटवले होते. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राघव चड्ढा यांनी आपल्यावरील तीन प्रमुख आरोपांना उत्तर दिले. खोट्या दाव्यांना काही प्रमाणात विश्वासार्हता मिळण्यापूर्वीच आपल्याला बोलावे लागले, असे ते म्हणाले. शुक्रवारी ‘आप’ने …

Read More »

राघव चड्ढा यांचा प्रश्न आम आदमी पक्षातला मात्र भाजपाने घेतली बाजू भाजपाचे नेते राघव चड्ढा यांच्या बाजूने

आम आदमी पार्टीने आपलेच नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून, पक्षाच्या नेत्यांनी पंजाबच्या खासदारावर टीका करणारे व्हिडिओ शेअर केले आहेत. परवापर्यंत, एकेकाळचे अरविंद केजरीवाल यांचे लाडके असलेले चड्ढा, ‘खरे मुद्दे’ मांडत नसल्याचा आरोप करत ‘आप’ने त्यांना उपनेतेपदावरून काढून टाकण्यापूर्वी राज्यसभेत ‘सर्वसामान्य माणसाचे प्रश्न’ मांडत होते. राघव चड्ढा आता …

Read More »

केशव उपाध्ये यांची माहिती, भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री सहभागी होणार

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, …

Read More »