Breaking News

कर्जावर ८ लाख रुपयांची कार घेतली तर किती रूपयांचे व्याज मोजावे लागेल ? मग समजून घ्या व्याजदर गणना

मुंबई: प्रतिनिधी
आपली स्वतःची कार घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. बँका परवडणाऱ्या व्याजदरात वाहन कर्ज जदेत असल्याने कार घेणे अनेकांच्या आवाक्यात आले आहे. वाहन कर्जामुळे एकाच वेळी मोठी रक्कम भरावी लागत नाही आणि दरमहा निश्चित रक्कम (EMI) भरावी लागते.

यामुळे त्यांचे मासिक बजेटही बिघडत नाही. वाहन कर्ज घेणारे बहुतेक लोक कारच्या किंमतीच्या ९० टक्के कर्ज घेऊनच खरेदी करतात. जर तुम्हीही असेच काही नियोजन करत असाल, तर कोणती बँक किती व्याज दराने कर्ज देत आहे आणि किती मुदतीचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला कारसाठी एकूण किती पैसे फेडावे लागतील याची माहिती आम्ही देत आहोत. ५ लाख आणि ८ लाख रुपयांच्या कारसाठी ३ वर्ष, ५ वर्षे आणि ७ वर्षांच्या कर्जावर कारच्या अंतिम किंमतीची गणना समजून घेऊया.
बहुतेक बँका कार कर्जावर ८ टक्के व्याजदर आकारत आहेत. यापैकी बँक ऑफ बडोदामध्ये कार कर्जाचा प्रारंभिक व्याज दर ७.२५ टक्के आहे. तर कॅनरा बँकेचा ७.३० टक्के आणि अॅक्सिस बँकेचा ७.४५ टक्के व्याजदर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ७.७० टक्के आणि खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक ७.९० टक्के दराने कार कर्ज देते. वाहन कर्जावरील सध्याचा व्याजदर लक्षात घेता, कार कर्जाची ८ टक्के दराने गणना केल्यास आपल्याला ती कार कितीला पडेल याचे चित्र स्पष्ट होईल.

५ लाखांच्या कारची अंतिम किंमत किती असेल?

-जर ८ टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी कर्ज घेतले तर १५,६६८ रुपयांचा EMI भरावा लागेल. तीन वर्षात एकूण ६४,०५५ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. अशा परिस्थितीत ३ वर्षानंतर ५ लाख रुपयांच्या कारची अंतिम किंमत ५,६४,०५५ रुपये असेल.
– हेच कार कर्ज ५ वर्षांसाठी ८ टक्के व्याजदराने घेतले तर १०,१३८ रुपयांचा EMI जाईल. म्हणजेच एकूण १,०८,२९२रुपयांचे व्याज भरावे लागेल. ५ वर्षांनंतर या कारची अंतिम किंमत ६,०८,२९२ रुपये असेल.
– कार कर्ज ७ टक्के व्याजाने ७ वर्षांसाठी घेतले, तर ७,७९३ रुपयांचा EMI असेल. कर्ज फिटेपर्यंत एकूण १,५४,६२१ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजे ५ लाख रुपयांच्या कारसाठी आपल्याला ६,५४,६२१ रुपये द्यावे लागलेले असतील.

८ लाखांच्या कारची अंतिम किंमत किती असेल?

– जर ८ लाख रुपयांचे कार कर्ज ८ टक्के व्याजासह ३ वर्षांसाठी घेतले, तर २५,०६९ रुपयांचा EMI जाईल. म्हणजेच एकूण १,०२,४८७ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. ३ वर्षांनंतर, ८ लाख रुपयांच्या कारची अंतिम किंमत ९,०२,४८७ रुपये असेल.
– जर कार कर्ज ५ वर्षांसाठी घेतले गेले, तर १६,२२१ रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच एकूण १,७३,२६७ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. ५ वर्षांनंतर ८ लाख रुपयांच्या कारची अंतिम किंमत ९,७३,२६७ रुपये असेल.
– कार कर्ज ७ वर्षांसाठी घेतल्यास, १२,४६९ रुपयांचा EMI पडेल. कर्जाचा कालावधी संपेपर्यंत एकूण २,४७,३९४ रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजे कारची अंतिम किंमत १०,४७,३९४ रुपये असेल.

Check Also

फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *