Breaking News

महिला प्रवाशांना परवानगी द्या, रेल्वे म्हणते रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर राज्य सरकारला पत्र पाठवत दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई महानगरात राहत असलेल्या चाकरमानी महिलांना नवरात्रोत्सावाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला पाठविले. त्यावर तातडीने पश्चिम रेल्वेने त्यावर उत्तर देत राज्य सरकारच्या विनंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर सर्वसाधारण महिलांना प्रवासास परवानगी देता येणे शक्य असल्याचे रेल्वे विभागाने राज्य सरकारला पत्रान्वये कळविले आहे.

कोरोनातून सावरत मुंबईकरांचे जनजीवन पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून एकेक गोष्ट Mission Begin Again अंतर्गत पुन्हा सुरु करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईकरांची जीवन वाहीनी असलेली लोकल रेल्वे पुन्हा सर्वसाधारण नागरिकांसाठी सुरु करण्याचा एक भाग म्हणून पहिल्यांदा महिलासांठी रेल्वे सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यानुसार यासंदर्भात मदत व पुर्नवसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवित १७ ऑक्टोंबरपासून महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करू देण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारे पत्र पाठवित. राज्य सरकारने त्यास मान्यता दिल्याचे रेल्वेस स्पष्ट केले.

परंतु पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागाकडून यास तात्काळ उलट टपाली पत्र पाठवित सदरचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याने त्यांच्या मंजूरी नंतरच महिलांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *