Breaking News

शेअर्स मार्केटमध्ये महिन्यात कमावला ९०० कोटींचा नफा, माहित आहे का? कोण अवघ्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाला यांनी कमावले ९०० कोटी कमावले

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना दोन कंपन्यांच्या शेअर्समधून तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई अवघ्या एका महिन्यात झाली आहे.

टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ९०० कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत सुमारे १३ टक्के वाढ झाली आहे, तर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये या कालावधीत ११.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या दोन कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत या महिन्यात ९०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत टाटा मोटर्सचे ३ कोटी ७७ लाख ५० हजार शेअर्स आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत २८७.३० रुपयांवरून ३३१ रुपये प्रति झाली आहे. म्हणजेच प्रति शेअर ४३.७० टक्के निव्वळ वाढ. त्यानुसार राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या टाटा मोटर्सच्या शेअर होल्डिंगमधून १६५ कोटी रुपये कमावले.

याशिवाय राकेश झुनझुनवाला यांच्याकडे एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत टायटन कंपनीचे ३ कोटी ३० लाख १० हजार ३९५ शेअर्स आहेत. त्याचबरोबर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ९६ लाख ४० हजार ५७५ शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचे टायटनमध्ये एकूण ४ कोटी २६ लाख ५० हजार ९७० शेअर्स आहेत.

सप्टेंबरमध्ये टायटनच्या शेअर्सचा भाव १९२१.६० रुपयांवरून २०९२.५० रुपयांवर गेला. या कालावधीत शेअरच्या किमतीत १७०.९० रुपयांची वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी या शेअर्समधून ७२८.९० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

भारताचे वॉरेन बफे म्हणून राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए आहेत. फोर्ब्सच्या यादीतील भारतीय श्रीमंतांच्या यादीत ते ४८ व्या क्रमांकावर आहेत. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश आहे.

झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी झाला आणि ते मुंबईतच वाढले. त्यांचे वडील आयकर अधिकारी होते. सेडनहॅम महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर  त्यांनी भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट संस्थेतून पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी दलाल स्ट्रीटकडे वळण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये त्यांनी भांडवल म्हणून ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. सप्टेंबर २०१८ मध्ये या भांडवलाची किंमत ११ हजार कोटी रुपये झाली.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *