Breaking News

कोरोना: ६ दिवसात ४ लाखाहून अधिक कोरोनामुक्त तर १४ दिवसानंतर १५ हजाराची घट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात मागील ६ दिवसात ४ लाख ४२ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील १४ दिवासांपासून ५० हजार ते ६० हजाराहून अधिक आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज एकदम १५ हजार कमी रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक गोष्ट असून अशाच पध्दतीने बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या संख्येत घट होत राहीली तर निर्बंध शिथील लवकरच होतील.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला ५४ हजार ९८५, २२ एप्रिलला ६२ हजार २९८, २३ एप्रिलला ७४ हजार ४५, २४ एप्रिलला ६३ हजार ८१८, २५ एप्रिलला ६१ हजार ४५० आणि आज २६  एप्रिल रोजी ७१ हजार ७३६ असे एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मागील २४ तासात राज्यात ७१ हजार ७३६ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ३६ लाख ०१ हजार ७९६ बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे. तर आज राज्यात ४८ हजार ७००  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने ६ लाख ७४ हजार ७७० इतके अँक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. राज्यात आज ५२४  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५९,७२,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४३,४३,७२७ (१६.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३८४० ६३१४८४ ७१ १२८६१
ठाणे ९५८ ८००८० १०९९
ठाणे मनपा ७४९ ११८५६७ १४७३
नवी मुंबई मनपा ५०३ ९९१८४ १२९२
कल्याण डोंबवली मनपा ८७९ १२३८१८ १२४३
उल्हासनगर मनपा ९३ १८५८४ ३९८
भिवंडी निजामपूर मनपा ५७ १००४२ ३८०
मीरा भाईंदर मनपा ४८३ ४५७५५ ७७१
पालघर ३२४ ३०९०४ ३४५
१० वसईविरार मनपा ६६३ ५१६१५ ८७३
११ रायगड ७२४ ६०४८० २० १२२३
१२ पनवेल मनपा ४१० ५५०६९ २२ ७९७
ठाणे मंडळ एकूण ९६८३ १३२५५८२ १३० २२७५५
१३ नाशिक १५५२ ९७५९७ १२१०
१४ नाशिक मनपा २८८५ १८११५२ १४७८
१५ मालेगाव मनपा ७७५४ १९४
१६ अहमदनगर २२५४ १०८८९३ २३ ११५५
१७ अहमदनगर मनपा ५१७ ४९९७८ १८ ६७०
१८ धुळे १४४ २०५३८ २३९
१९ धुळे मनपा ६० १५९३२ १९५
२० जळगाव ७२२ ८६६९० १४०३
२१ जळगाव मनपा ९७ २७६२६ ४३६
२२ नंदूरबार २४५ ३१५५३ ४६२
नाशिक मंडळ एकूण ८४७६ ६२७७१३ ६० ७४४२
२३ पुणे २२११ १९२५३९ ११ २४०७
२४ पुणे मनपा २६६६ ४१३३४९ ५१६०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२८५ १९६९१९ १४६७
२६ सोलापूर १३४० ७२५३७ १४६४
२७ सोलापूर मनपा १८३ २५४७६ ८७२
२८ सातारा १४०८ ९४६७४ १९ २१५८
पुणे मंडळ एकूण ९०९३ ९९५४९४ ४१ १३५२८
२९ कोल्हापूर ६४२ ४३३५४ १३०१
३० कोल्हापूर मनपा १३२ १८९०४ ४५३
३१ सांगली ८४८ ४९७९१ १२८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४० २३८४० ७०७
३३ सिंधुदुर्ग १९१ ११७५३ १३ २८८
३४ रत्नागिरी ५३६ २०२०० ४९९
कोल्हापूर मंडळ एकूण २५८९ १६७८४२ २३ ४५२९
३५ औरंगाबाद ४९१ ३७७५५ ४३०
३६ औरंगाबाद मनपा ३८६ ८१४१७ ५७ १२४६
३७ जालना ६९८ ४११९७ १८ ५९५
३८ हिंगोली २३९ १२६४४ १४७
३९ परभणी ३५९ १७९०० २८२
४० परभणी मनपा १४६ १४१८५ २४७
औरंगाबाद मंडळ एकूण २३१९ २०५०९८ ८२ २९४७
४१ लातूर ७७० ४८७३१ १७ ६९३
४२ लातूर मनपा २८३ १८१२९ ३४२
४३ उस्मानाबाद ५४२ ३५८९८ १८ ८४५
४४ बीड १०९९ ४९२९२ २२ ८४३
४५ नांदेड ५४७ ३७७४९ २१ ८४५
४६ नांदेड मनपा ३०४ ४०३८५ ६७१
लातूर मंडळ एकूण ३५४५ २३०१८४ ८६ ४२३९
४७ अकोला ६६ १४०९५ २०६
४८ अकोला मनपा १२८ २४५६७ ३९४
४९ अमरावती ३९६ २४५०५ ४३६
५० अमरावती मनपा १४४ ३६७१४ ४०७
५१ यवतमाळ १७०६ ४५५८९ २१ ८२८
५२ बुलढाणा ८५१ ४११०० ३५५
५३ वाशिम २५० २५४६३ २४२
अकोला मंडळ एकूण ३५४१ २१२०३३ ४५ २८६८
५४ नागपूर २०८० ८८८३४ ११९८
५५ नागपूर मनपा ३७९९ ३०२४९३ ३४ ३६७१
५६ वर्धा ४९३ ३८३६३ ४८७
५७ भंडारा ७२१ ४६१४६ ४२२
५८ गोंदिया ५९७ ३०४७७ ३१७
५९ चंद्रपूर ९५७ ३६४६७ ३७८
६० चंद्रपूर मनपा ४४२ १९१८४ २१६
६१ गडचिरोली ३६५ १७६७१ १० १६९
नागपूर एकूण ९४५४ ५७९६३५ ५७ ६८५८
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण ४८७०० ४३४३७२७ ५२४ ६५२८४

आज नोंद झालेल्या एकूण ५२४ मृत्यूंपैकी २९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे ११५ मृत्यू, औरंगाबाद-४८, नागपूर-१३, अहमदनगर-११, जालना-८, नांदेड-८,  नाशिक-६, पुणे-६, सातारा-४,  सोलापूर-३, रायगड-२,  ठाणे-२, भंडारा-१, लातूर-१, वाशिम-१  आणि यवतमाळ-१  असे आहेत.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *