Breaking News

कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांच्या गोंधळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित

नागपूर : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होते. सभागृहाचं सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वाढत्या गदारोळामुळे सभागृह चालविणे अशक्य झाल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. पुढेही असाच तर गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर, काॅग्रेसचा जनआक्रोश मोर्चा  विधानभवनावर विरोधी पक्षांच्यावतीने आज काढण्तयात आला. या मोर्चाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे करणार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहाबाहेर मोर्चा तर सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले.” गली गली मे शोर है,भाजप सरकार चोर है “ शेतकऱ्यांना न्याय देणार नसाल तर सत्ता सोडा ” अशा घोषणाबाजीने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले,तर सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने तीन वेळा तहकूब करावे लागले.परंतू पुन्हा कामकाज सुरू होताच पुन्हा तसाच गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *