Breaking News

सभागृहातच मुनगंटीवारांनी दिली शिवसेनेच्या आमदाराला मंत्री पदाची ऑफर विधानसभेत चर्चेच्यावेळी दिली

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील सत्ता स्थापनेत शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्याने सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. मात्र प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्तावावरील चर्चे दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्याच आमदाराला भर विधानसभेत मंत्री पदाची ऑफर दिल्याने क्षणभर सभागृहही बुचकाळ्यात पडले.

अभिनेत्री कंगणा राणावत आणि वृत्तनिवेदक तथा संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाला मुदतवाढ देण्याच्या प्रश्नावरून सुरु झालेल्या चर्चेच्यावेळी मुनगंटीवार यांनी सदरची ऑफर दिली.

शिवसेना प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी आणि कंगणा राणावत यांच्या विरोधात मागील अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यास आणखी एकदा मुदत वाढ देण्याविषयीचा प्रस्ताव माजी मंत्री दिपक केसरकर यांनी विधानसभेत मांडला.

त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दिपक केसरकरजी तुम्ही खरेच सत्याची बाजू धरणारे व्यक्ती आहात. आमच्या काळात तुम्ही नेहमीच सत्याची साथ दिलात. त्यामुळे या सरकारने मंत्रिपद देतील नाही देतील मात्र फडणवीसांचे सरकार पुन्हा आल्यानंतर आम्ही तुम्हाला मंत्रिपद देवू असे सांगत केसरकर यांना भर सभागृहातच मंत्रिपदाची ऑफर दिली.

त्यावर सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्य बुचकाळ्यात पडले. मात्र त्यावर कोणाही भाष्य केले नाही.

Check Also

पीओपीच्या मुर्त्या तयार करण्यास अखेर परवानगी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य

मुंबई : प्रतिनिधी पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *