Breaking News

चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडर मंजूर होत नाही अजित पवारांचा पाणी पुरवठा विभागावर आरोप

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की, सारे काही आलबेल सुरु आहे, असे नसून कोणी कितीही नाही म्हणटले तरी पाणी पुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशि‌वाय टेंडरच मंजूर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला.

विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुक्ताईनगर-बोदवड-वरणगांव या भागातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याबाबतचा मुद्दा भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. त्यावेळी सदरचे काम चार-पाच महिने झाले तरी त्यास सुरुवात करण्यात येत नसल्याचा उल्लेख खडसे यांनी केला. त्यावेळी अजित पवार यांनी हाच धागा पकडत पाणी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत चिरीमिरी घेतल्याचा आरोप केला.

यावेळी खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आगामी १५ दिवसात याबाबत चौकशी करून काम सुरु करण्याचे आदेश दिले जातील.

लोणीकर यांच्या उत्तरातच दिरंगाई दिसत असल्याने अजित पवार यांनी सरकारच्या कामकाज पध्दतीवर हल्ला चढवित या सभागृहात बसलेले सत्ताधारी बाकावरील सर्वच आमदार जाणीवपूर्वक शांत बसत आहेत. बोलण्यास त्यांचीही अडचण होत आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेच्या अनुषंगाने नाथाभाऊ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून १५ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र इतर आमदारांच्या कामांचे काय? असा सवाल करत त्या विभागात चिरीमिरी घेत असल्याचा आरोप केला.

या आरोपांवर मंत्री लोणीकर हे काय उत्तर काय देतात याकडे सर्व आमदारांचे लक्ष होते. मात्र लोणीकर यांनी यावर कोणतीच प्रक्रिया व्यक्त न करता दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *