Breaking News

राज्यातील सर्व शेती, शाळा, वसतिगृहांना सौर ऊर्जा पुरविणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी

भविष्यकाळात राज्यात कोळशावर आधारीत वीज शेतीला पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सोलर यंत्रणेचा वापर करून दिवसाची वीज शेतकऱ्याला पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळांना आणि सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सौर ऊर्जेवरील वीज पुरवठा करण्यात येणार असून शेती, शाळा आणि वसतिगृहांना सौर ऊर्जा पुरविणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज्यात बंद पडलेले वीज निर्मिती प्रकल्प नव्याने सुरु करून त्यांच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत ५ ते ६ हजार मेगावॉट वीज निर्मिती करतोय. त्यात आणखी वाढ करून १३ हजार मेगावँट वीजे निर्मिती क्षमता वाढविणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वीज पुरवठ्यामधील केळकर समितीने केलेल्या सूचनांनुसार अनुशेष दूर करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीज जोडणी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास २२ हजार ४३ कोटी रूपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. तरीही त्यांच्याकडून सक्तीची वीज बील वसूली केली जात नाही. उलट ज्या शेतकऱ्यांची ३० हजार रूपये थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना ३ हजार रूपये तर ज्यांची ३० हजार रूपयांहून अधिक आहे अशा शेतकऱ्यांना ५ हजार रूपये वीज बीलापोटी भरण्यास सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांवर आकारण्यात आलेले थकीत बीलावरील व्याजही माफ करण्यात आले आहे. तसेच वीज बील तयार करताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राज्यात अपघात मुक्त वीज पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठ्याचे अत्याधुनिक करण्यासाठी नवी योजना २०१७ ते २२ या ५ वर्षासाठी येत्या १५ दिवसात नवी योजना जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकी एक किंवा दोन शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी पंजाब, हरीयाणाच्या धर्तीवर एक ट्रान्सपॉवर बसवून देण्यात येणार असून त्यासाठी पाच हजार कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *