Breaking News

नवाब मलिकांच्या त्या ट्विटवर क्रांती रेडकरानी दिले हे उत्तर सायबर पोलिसांमध्ये करणार तक्रार

मुंबईः प्रतिनिधी
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांच्या अनुषंगाने एका कॅप्टन जॅक स्पॅरो या अकाऊंटवरील व्यक्तीसोबत चॅट केल्याचे फोटोग्राफ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारीत केले. मलिकांनी केलेल्या त्या चॅटबाबत क्रांती रेडकर यांनी सदरचे ते चॅट खोटे असून जाणीवपूर्वक ते निर्माण करण्यात आल्याचा खुलासा करत यासंदर्भात आपण लवकरच पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे जाहीर केले.
नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरवरून ओ माय गॉड असे म्हणत ते चॅट आज सकाळी प्रसारीत केले. त्यामुळे नवाब मलिक यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास वानखेडे कुटुंबियांकडून बक्षिस देवू असेही त्यात क्रांती रेडकर यांनी त्यात म्हणाल्या. त्यामुळे यातून वेगळाच मतितार्थ ध्वनित होत आहे.
या अनुषंगाने सदरचे चॅट हे जाणीवपूर्वक पध्दतीने निर्माण करण्यात आले असून ते प्रसिध्द करण्यापूर्वी त्याची कोणतीही पडताळणी केलेली नाही. तसेच अशा पध्दतीचे कोणतेही संभाषण आपण केले नसल्याचा दावाही क्रांती रेडकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला.
तसेच या पोस्टच्या संदर्भात आणि त्यावरील चॅटबाबत आपण मुंबई सायबर सेलकडे तक्रार नोंदविणार आहे. समर्थकांनो काळजी करू नका ही आमची संस्कृती किंवा भाषा नाही असा उपरोधिक टोलाही क्रांती रेडकर यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला.
त्याचबरोबर त्यांनी दुसरे एक ट्विट करत आता हे या पातळीवर आले फारच दुःखदायक असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Check Also

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *