Breaking News

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी

ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपने अलीकडेच 2.21.19.15 बीटा अपडेट जारी केले आहे. WABetaInfo च्या एका अहवालातून समोर आलं आहे की, या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ग्रुप कार्डद्वारे ग्रुप कॉल करणं खूप सोपं होईल. या नवीन अपडेटमध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट उपलब्ध असतील.

जेव्हा वापरकर्ते संपर्क कार्ड पाहतील तेव्हा त्यांना शॉर्टकट दिसेल. जे बीटा वापरकर्ते  हे फिचर पाहत नाहीत त्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. या व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपच्या नवीनतम आयओएस (iOS) बीटा आवृत्तीमध्ये नवीन व्हिडिओ नियंत्रण हे फिचर आले आहे. हे फिचर आधीपासूनच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅपने बीटा अँड्रॉइड 2.21.3.13 साठी ‘म्यूट व्हिडीओ’ हे नवीन फिचर सादर केले आहे. आयओएस वापरकर्ते लवकरच व्हिडिओ पाठवण्यापूर्वी म्यूट करू शकतील. हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी आयओएस बीटा वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहे.

अहवालानुसार, व्हॉट्सअॅप आयओएस वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइनसह फीचर आणत आहे. हे वैशिष्ट्य सध्या विकासाच्या टप्प्यात आहे आणि व्हॉट्सअॅपने अद्याप या वैशिष्ट्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

Wabetanifo च्या मते, अखेर व्हॉट्सअॅप म्यूट व्हिडिओ फिचर आयओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. ‘व्हॉट्सअॅपने 7 महिन्यांपूर्वी अँड्रॉईड 2.21.3.13 साठी व्हॉट्सअॅप बीटावरील व्हिडीओ म्यूट करण्यासाठी नवीन फीचर सादर केले. वापरकर्ते व्हिडिओला GIF मध्ये रूपांतरित करण्यासाठी सुधारित टॉगलमध्ये म्यूट व्हिडिओ पर्याय पाहू शकतात.

दरम्यान,  व्हॉट्सअॅपने नुकचंच वापरकर्त्यांना चित्रांचे स्टिकर्समध्ये रूपांतर करण्यास अनुमती देणारं फिचर आणलं आहे. हे फिचर अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. व्हॉट्सअॅप आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी हे फिचर विकसित करत आहे. या व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप नॉन-बीटा परीक्षकांना मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्य वापरण्याची शक्यता देखील देत आहे.

जेव्हा हे वैशिष्ट्य उपलब्ध होईल, तेव्हा कॅप्शन बारच्या पुढे एक नवीन स्टिकर चिन्ह असेल. जेव्हा तुम्ही ते निवडाल तेव्हा फोटो स्टिकर म्हणून पाठवला जाईल. व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, स्टिकरमध्ये फोटो बनवण्याचा पर्याय डायलॉग बॉक्समध्ये दिसू शकतो.

Check Also

“बुरा ना मानो होली है”, श्रीरामांनी वस्ताला केला प्रश्न, माझ्यामुळे तु की तुझ्यामुळे मी

एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *