केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केल आहे. तसच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे.
पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाल आहे, कारण जमिनीवर कोणतीही कारवाई होत नाही.
मुंबई महापालिके ची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्सची कृती ही केवळ त्याच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी विलंब असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री पर्यावरण मंत्री भूपिंदर यादव यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रासह देशातील वाढत्या वायू प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त करत हे प्रदुषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि देशासाठी लवकरच धोरण जाहिर करावे अशी मागणी केली आहे.
तसेच या प्रदुषणामुळे आणि वातावरणीय बदलामुळे सर्वसामान्य जनतेच्या दैंनदिन जीवनावर परिणाम होत आहे. नागरिकांना शुध्द हवा आणि हवेतील ऑक्सीजन मिळावा यादृष्टीने पर्यावरण मंत्रालयाकडून योग्य ती नियमावली जाहिर होण्याची गरज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय मुंबईकरांना सातत्याने भेडसावत असलेल्या वायु प्रदुषणाबाबत लिहीताना आदित्य ठाकरे यांनी माहुल आणि वडाळा येथील केंद्र सरकारच्या रिफायनरीमुळे आणि मुंबईच्या पूर्वेला असलेल्या राष्ट्रीय खत प्रकल्प आणि इतर औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणावर वायु प्रदुषण निर्माण होत आहे. त्यामुळे हे प्रदुषण निर्माण करणाऱ्या औद्योगिक वसाहती, केंद्र सरकारच्या रिफायनरीज इतर ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात अशी मागणीही केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
त्याचबरोबर सातत्याने मुंबईच्या चौहोबाजूंनी नव्या इमारतींची कामे सुरु असल्याने प्रदुषणातही वाढ होत असून हवेची गुणवत्ता सुधारून नागरिकांना चांगली हवा मिळावी यादृष्टीने मुंबई महापालिकेला सूचना द्याव्यात अशी मागणीही केली.
I’ve written to Union Minister Bhupinder Yadav ji about Maharashtra’s worsening air pollution crisis, also focusing on Mumbai’s AQI.
The absence of a full time environment minister and lack of sensitivity towards public issues in the state’s illegal Govt has worsened this… https://t.co/srNTfdYfbe pic.twitter.com/KkQSJp3Mdq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2023