Breaking News

मुंबई महानगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊसच पाऊस ५ जुलै सकाळपर्यंतची आकडेवारी हवामान खात्याकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई शहर, उपनगर आणि कोकणातील काही भागात ४ आणि ५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानुसार कालपासून पडणाऱ्या पावसाने अखेर दुपारी ३ च्या जवळपास उघडीप दिली. मात्र या मागील ३० तासात जवळपास ३०० मिमी पर्यंतचा पाऊस कोसळल्याचा अंदाजही या विभागाने व्यक्त केला.
साधारणत: काल सकाळ‌ी १० च्या सुमारात सुरु झालेला पाऊस आज दुपारपर्यत कायम बरसत होता. त्यामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी सततच्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. उपनगरातही पावसाने उसंत न घेता सतत कोसळत राहील्याने अनेक जणांनी किरकोळ खरेदीसाठी बाहेरे पडण्याऐवजी घरात राहणे पसंत केले.
आजही सकाळपासूनच पावसाने सगळ्या भागात हजेरी लावली. त्यामुळे साधारणत: ६ तास पाऊस सतत कोसळत होता. यापैकी ३ तास मध्यम तर ३ तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत राहीला. याकाळात ६० ते १०० मिमीचा पाऊस पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  तर काल दिवसभरात मुंबईसह कोकणात जवळपास २०० मिमी चा पाऊस कोसळल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *