Breaking News

हवामान खात्याकडून नवा अलर्ट जारी या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

मुंबई: प्रतिनिधी

दोनच दिवसांपूर्वी राज्यात ३० ऑगस्टपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा पावसाच्या अनुषंगाने या हवामान विभागाने पुन्हा नव्याने आज इशारा दिला.

आज जारी केलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आज यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील जवळपास सात महानगरपालिकांनी पुढील ४८ तासात अतिवृष्टीचा होणार असल्याचा इशारा नागरीकांना दिला आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात दुपारपर्यत मुसळधार स्वरूपाचा तर दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झालेली असली तरी पाऊस थांबला नाही.  दिवसभरात जालना, बीड, परभणी, अहमदनगर, वाशिम, यवतमाळसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या भागातील अनेक नद्या, नाले आणि कॅनल भरून वाहताना दिसत होते. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

 

 

Check Also

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व …

Leave a Reply

Your email address will not be published.