Breaking News

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम गायकवाड यांनी केला. तसेच राज्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे ही धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
वंचित आधाडीचे वरळीचे उमेदवार गौतम गायकवाड हे शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून लढत आहेत. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून वंचित आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांच्यावर दबाव निर्माण केला जातो आहे. त्यांनी माघार घ्यावी या करीता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत ठाण्यातील शिवसैनिक त्यानां फोन करून धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कै. आनंद दिघे यांचे सहकारी असलेल्या कार्यकर्त्यांने गौतम गायकवाड त्यांना दादर येथे बोलावून २ कोटी रुपये घ्या नि माघार घ्या अशी धमकी दिली असून याबाबत वरळी पोलीस ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे रीतसर तक्रार केली असून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांकडेही देखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक जिकंण्यासाठी विरोधी उमेदवाराला धमकावणे, या शिवसेनेच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशा धमक्यांना वरळीकर, आणि सामान्य जनता आता घाबरणार नाही, अशा वृत्तीने महाराष्ट्राचा ठाकरे परिवाराने बिहार करायचा ठरवला आहे हे सिद्ध होते. त्यामुळे या निवडणूकीत भीतीचे वातावरण निर्माण करून मतदारांना भयभीत करण्याचा हा डाव आहे. तरी निवडणूक आयोगाने यात लक्ष घालून संबंधित उमेदवारावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *