Breaking News

स्वस्तात घर-मालमत्ता खरेदीची संधी, एसबीआयकडून मालमत्तांचा लिलाव ऑनलाईन ऑक्शन करता येणार

मुंबई: प्रतिनिधी

तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

एसबीआय मालमत्तांचा लिलाव करणार आहे. २५ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची मिळू शकते. एसबीआय जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री लिलावाद्वारे करणार आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदाही मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्तांचा समावेश आहे.

लिलाव कधी होणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मेगा ई-लिलाव केला जाईल असे बँकेने म्हटले आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा लिलाव केला जाईल. या लिलावात वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करता येऊ शकते.

कुठे नोंदणी करावी?

बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-लिलावासाठी इच्छुक बोलीदारास e-Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करावी लागेल.

लिलावात सहभागी कसं व्हायचं?

ई लिलावात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टीची अनामत रक्कम जमा करावी लागेल.  लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजीटल सिग्नेचर आवश्यक आहे. तुम्हाला ई लिलावामध्ये अन्य अधिकृत एजन्सीद्वारेही सहभागी होता येईल. संबंधित बँक शाखेत रक्कम जमा करुन, तुमची कागदपत्र दाखवल्यानंतर, तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. नियमावली पाळून तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.

केवायसी आवश्यक

बोलीदाराला आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे केवायसी दस्तऐवजांची पडताळणी केली जाईल. याला २ दिवस लागू शकतात.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर भेट देऊ शकता https://bank.sbi/web/sbi-in-the-news/auction-notices/bank-e-auctions.

वेळोवेळी बँकांकडून लिलाव

मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली नसेल बँका ती मालमत्ता ताब्यात घेते. अशा मालमत्तांचा वेळोवेळी बँकांकडून लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.

Check Also

फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *