Breaking News

FD पेक्षा जास्त व्याज हवंय?, या योजनांमध्ये गुंतवा पैसे असे आहेत तीन पर्याच

मुंबई: प्रतिनिधी

फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदर सध्या सर्वात कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुम्हाला मदत करू शकतात. या योजनांवर तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळेल. तसेच तुमचे पैसेही सुरक्षित असतील. या योजनांबद्दल आपण जाणून घेऊया.

किसान विकास पत्र (KVP)

सध्या किसान विकास पत्र (KVP) बचत योजनेत ६.९ टक्के व्याज दिले जात आहे. KVP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. तथापी, तुमची किमान गुंतवणूक १००० रुपये असावी. गुंतवणूकदाराचे वय किमान १८ वर्षे असावे. सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त यामध्ये जॉइंट अकाउंटचीही सुविधा आहे.अल्पवयीन मुले देखील योजनेत सामील होऊ शकतात, परंतु त्यांच्या पालकांच्या देखरेखीची आवश्यकता असेल.

जर तुम्हाला तुमची गुंतवणूक काढायची असेल तर किमान २.५ वर्षे वाट पाहावी लागेल. त्याचा लॉक-इन कालावधी अडीच वर्षांचा आहे. यामध्ये आयकर कायदा 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट उपलब्ध आहे. या योजनेत पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी १० वर्षे ५ महिने लागतील.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC)

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील गुंतवणुकीवर ६.८% वार्षिक व्याज मिळत आहे. यामध्ये व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते, परंतु व्याजाची रक्कम गुंतवणुकीच्या कालावधीनंतरच दिली जाते. यामध्ये आयकर कायदा 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट उपलब्ध आहे. NSC खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान १००० रुपये गुंतवावे लागतील.

हे खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडता येते आणि ३ प्रौढांच्या नावानेही संयुक्त खाते उघडता येते. तुम्ही NSC मध्ये कितीही रक्कम गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या योजनेत ६.८ टक्के व्याज मिळत आहे. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट व्हायला १० वर्षे ७ महिने लागतील.

मासिक उत्पन्न योजना

यो योजनेत ६.६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. या योजनेअंतर्गत किमान १००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. तुमचे एकच खाते असल्यास तुम्ही कमाल ४.५ लाख रुपये जमा करू शकता. दुसरीकडे जर तुमचे संयुक्त खाते असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे. या योजनेअंतर्गत व्याज वार्षिक आधारावर दिले जाते, परंतु ते तिमाही आधारावर मोजले जाते. हे खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडता येते आणि ३ प्रौढांच्या नावानेही संयुक्त खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. या योजनेत पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी १० वर्षे ११ महिने लागतील.

Check Also

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *