Breaking News

सुजय पाठोपाठ पिता विखे-पाटील आणि गोरेही कमळ हातात घेणार मोहीते-पाटील पितापुत्रांचा दोन दिवसांच्या अंतराने भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभेची राजकिय गणिते डोळ्यासमोर ठेवत लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण भाजपचे कमळ हातात घेत आहेत. यात सुजय विखे-पाटील यांचे पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असून काँग्रेसचे जयकुमार गोरे हेही हातात कमळ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे सुपुत्र रणजीतसिंह मोहीते-पाटील हे दोन दिवसांच्या अंतराने भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे सुपुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभेचे तिकीटही मिळविले. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रवेशाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर फोडत स्वतः नामानिरोळे राहण्याचा प्रयत्न केला. परंतु सुजय पाठोपाठ येत्या २४ तासाच्या आत राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर त्यांच्याबरोबर काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे ही भाजपच्या वाटेवर असून भाजपचे आमदार पडळकर यांच्या माध्यमातून ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबरोबर आज मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्रव रणजीतसिंह मोहीते-पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश होणार असून त्यानंतर दोन दिवसांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या पध्दतीने राज्यातील दोन मातब्बर घराणी भाजपचे कमळ हातात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *