Breaking News

या २० आएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या ओ.पी.गुप्ता नवे वित्त विभागात तर विकास चंद्र रस्तोगी उच्च व तंत्रशिक्षणचे प्रधान सचिव

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांची नियुक्ती वित्त विभागात (खर्च) चे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून रस्तोगी हे काम पाहणार आहेत. या दोन आयएस अधिकाऱ्यांसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या.

याशिवाय इंद्रा माल्लो यांची इंटिग्रेटेड बाल विकास योजनेच्या आयुक्त पदावरून सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांची बदली एमआयडीसीच्या सहमुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे.

रूबल प्रखेर-अग्रवाल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदवारून आयसीडीसी नवी मुंबईच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली. तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली वैद्यकिय शिक्षण आणि औषधे विभागाच्या सह सचिव पदी करण्यात आली.

रूचिका जयवंशी यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदावरून पुणे येथील महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर संजय यादव यांची एमएसआरडीसीच्या सहसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. शेलेष नवाई यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदावरून सामान्य प्रशासन विभागाच्या उप सचिव पदी बदली करण्यात आली.

आर.एच ठाकरे यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर जे.एस.पापळकर यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदावरून अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जी.एस.बोडके यांची महाराष्ट्र वीज वितरणच्या सह संचालक पदावरून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली.

राहुल अशोक रेखावर यांची व्यवस्थापकीय संचालक एम.एस.सीड कार्पोरेशन या पदावरून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर रविंद्र भिवंडे यांची जालना जिल्हाधिकारी पदावरून पुणे महापालिकेच्या अतिरक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. दिपककुमार मीना यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

पवनीत कौर यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पदावरून अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. विजय राठोड यांची अतिरिक्त नियंत्रक स्टँम्प पदावरून जालना जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच अकोला महापालिकेचे आयुक्त नीममा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

आंचल गोयल यांची एम.एस.फिल्मच्या सह व्यवस्थापकिय संचालक आणि सांस्कृतिक विकास कार्पोरेशनच्या पदावरून परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली.तर बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *