मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात आज घेण्यात आला. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन गरमच राहण्याची शक्यता आहे.
नागपूर करारानुसार वर्षभरातील एक अधिवेशन नागपूरात घ्यावे असे बंधनकारक आहे. याकालावधीत संपूर्ण राज्याची प्रशासकिय आणि सरकार नागपूरात स्थलांतरीत होते. मात्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनास कोरोनामुळे अपवाद करत मुंबईतच घेण्यात येणार आहे.
याशिवाय आगामी मुंबईत होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याचा विचार राज्य सरकारचा आहे.
तसेच मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी हा चारच दिवसांचा राहण्याची शक्यता असून ७ डिसेंबर किंवा ९ डिसेंबर या तारखे पासून सुरु होणार आहे. यासंदर्भातील विधिमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक उद्या होत असून त्यात अंतिम निर्णय अंतिम होणार आहे.
