Breaking News

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची औपचारीकता बाकी राहीली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांच्या तर तर मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांचा जवळपास विजय निश्चित मानला जात आहे. तर कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेना आणि भाजपात चुरस आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्या फेरीतील 28 हजार मतांची मोजणी झाली असून, भाजपाचे निरंजन डावखरे यांना १० हजार ३०४, तर शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना ९ हजार ४९४, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांना ६ हजार ५०० मते मिळाली आहेत.विधानपरिषदच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभरातीचे कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी होतील. एकूण ८ हजार ३५३ पैकी  4 हजार ५०० पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र अजून विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ एवढे मतदान झाले होते. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत २० हजार मतांपैकी ११ हजार मते विलास पोतनीस यांना मिळाली आहेत. रात्री उशीरापर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *