Breaking News

काँग्रेसची वाट बघणार नाही मात्र एमआय़एमशी चर्चा सुरुच ठेवणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांशी वंचित आघाडीचे पदाधिकारी संपर्कात होते. मात्र त्यांच्याकडूनही लोकसभेच्या कालवधीप्रमाणे फक्त चर्चेत गुंतवणूक ठेवण्याचा प्रकार सुरु असल्याने त्यांची फारकाळ वाट बघणार नसल्याचे जाहीर करत लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत एमआयएमशी चर्चा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारी मंडळात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती संदर्भातील प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता . मात्र देशाचे त्यांचे शीर्ष नेतृत्व देखील चर्चा करण्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचे ह्या परिस्थितीत देखील वारंवार स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस केवळ चालढकल करीत आहे की आम्ही युतीसाठी तयार आणि व्हिबीए तयार नाही. मात्र काँग्रेस मधील केंद्रीयस्तरावर देखील काही नेत्यांची चौकशी होवू नये आणि राज्यातील काँग्रेसमधील काही नेत्यांचीसुद्धा चौकशी होवू नये असा प्रयत्न होताना दिसत आहे.
जो अनुभव लोकसभा 2019 च्या निवडणूकांमध्ये काँग्रेसकडून आला तोच अनुभव आता विधानसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान येत आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ह्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आता काँग्रेससाठी फार
थांबणार नाही. केवळ चर्चेमध्ये गुंतुन राहणे शक्य नाही ही बाब त्यानी लक्षात घ्यावी. व्हिबीए आपली उमेदवार यादी लवकरच घोषित करणार असून एआयएमआयएम युतीबाबत त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यांचे प्रतिनिधी अमच्याशी चर्चा करायला आले होते. मैत्रीपूर्ण चर्चा झाली. ही चर्चा वंचित बहुजन उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत सतत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *