Breaking News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरः मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ सालापासून रखडलेल्या या पदोन्नत्या लवकरच मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली.
मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्याबाबत निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. या मंत्रिगटाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्य सचिवांच्या अहवालात फडणवीस, रश्मी शुक्लांचे पितळ उघडे: वाचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *