मुंबईः प्रतिनिधी
११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात २६ नोव्हेंबर २०२० अर्थात उद्यापासून सुरु होणार आहे. सकाळी १० वाजता रिक्त जागांसाठी दुसऱ्या फेरीची यादी लावण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ डिसेंबर पर्यत सुरु राहणार असून २ डिसेंबर रोजी प्रवेश पत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाणणी करण्यात येणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता प्रवेश झाल्याची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
या दुसऱ्या फेरीत मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कॉलेज, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कॉलेजसाठी प्रवेश निश्चित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकात जाहीर करण्यात आले.
