Breaking News

वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ तर काँग्रेसचे उमेदवार अशोक निलंगेकर पाटील यांना १९ हजार ३०० मते मिळाली. तर भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर यांना ३५ हजार १३ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव अटळ असल्याचे बोलले जात आहे.
बुलढाणा मतदारसंघात वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना १४ हजार ३६१ मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार हर्षवर्धन सपकाळ १३ हजार ६०१ मते मिळाली. तर शिवसेनेचे संजय गायकवाड यांना २३ हजार १४० मते मिळवून आघाडीवर होते.
नांदेड पूर्वमध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना १० हजार ८१, काँग्रेसचे डी.पी.सावंत ७ हजार ७३० मते तर वंचितचे मुंकुंदराव चावरे यांना ४ हजार २५५ मते मिळाली होती.
पालघर मतदारसंघात वंचितचे उमेदवार विराज गदग यांनी ९ हजार १८५ मते, तर काँग्रेसचे योगेश नाम यांना १८ हजार ८५५ मते मिळाली. सेनेचे श्रीनिवास वनगा यांना ३७ हजार ४७८ मते मिळवून आघआडीवर होते.
अंबरनाथ मतदारसंघात वंचितचे उमेदवार धनंजय सुर्वे यांना ९ हजार २६३ तर काँग्रेसचे उमेदवार रोहीत साळवे यांना १९ हजार २४० मते मिळाली. तर शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे २७ हजार मते मिळवून आघआडीवर होते.
विक्रोळी मतदारसंघात सिध्दार्थ मोकळे यांनीही ९ हजार १२२ मते मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ यांना ३४ हजार ८८१ मते मिळाली. तर येथील सेनेचे सुनिल राऊत यांना ६२ हजार ६६९ मते मिळवित आघाडीवर होते.
चांदीवलीत काँग्रेसचे नसीम खान यांना ५२ हजार ७११ तर शिवसेनेचे दिलीप लांडे यांना ५६ हजार ३८३ मते मिळाली होती. तर वंचितचे अब्दुल हसन खान यांना ६ हजार १६१ मते मिळाली. त्यामुळे नसीम खान यांना पराभवाच्या छायेत रहावे लागले.
चेंबूर विधानसभा मतदारसंघातही वंचितचे राजेंद्र माहुलकर यांना ८ हजार २१४ मते, काँग्रेसचे चंद्रकांत हंडारे १७ हजार ७४३ मिळाली. तर शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर २७ हजार ३२६ मते मिळाली. मनसेच्या उमेदवार कर्णाक दुनबळे यांनी ९ हजार ४१ मते मिळाली. या मत विभागाणीचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झाला.
कोल्हापूरातील चंदगंड मतदारसंघात वंचित विनायक पाटील यांना ३९ हजार ६२७ मते मिळाली असून ते सध्या आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश नरसिंग पाटील यांना ३८ हजार ६९९ मते, तर शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर २५ हजार १२४ मते मिळाली. यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अडचणीत आल्याचे दिसून येते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *