Breaking News

सावरकरांचे नातू राहीले वाट बघत मुख्यमंत्री गेले निघून मुख्यमंत्री ठाकरेंनी रणजित सावरकरांना भेट नाकारली

मुंबईः विशेष प्रतिनिधी
नुकतेच स्वांतत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने आपल्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना भेटीसाठी बसायला सांगून दुसऱ्याबाजूने निघून गेले.
स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कोणतेही अपमानजनक वक्तव्य शिवसेना सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला होता. तसेच त्यांच्याबद्दल कोणतेही निंदनीय गोष्टी खपवून घेतली जाणार नसल्याचा दम काँग्रेसला भरला होता. परंतु काँग्रेसने शिवसेनेच्या या इशाऱ्याला आणि दमला कोणतीही भीक घातली नाही. तसेच काँग्रेस सेवादलाने प्रकाशित केलेल्या पाक्षिकात महात्मा गांधींचा वध करणारा नथुराम गोडसे आणि स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे समलिंगी संबध असल्याची माहिती प्रसिध्द केली.
यामुळे भाजपाने काँग्रेसवर टीकेची झोड उठवित काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. याप्रकरणी राज्य सरकारकडून काँग्रेसच्या त्या पाक्षिकावर कारवाई करावी या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर हे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते.
मात्र मुख्यमंत्री उध्द ठाकरे यांनी आपल्या दालनातील दुसऱ्या सदनात सावरकरांना बसायला सांगून मुख्यमंत्री कार्यालयाच्या दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसने प्रसिध्द केलेल्या सावरकर विरोधी माहितीवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *