Breaking News

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक

मुंबई: प्रतिनिधी

रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही त्यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.

राज्य सरकारकडून चित्रमहिर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावे चित्रपट, नाट्य, लोककला व नृत्य याचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील शासकिय महाविद्यालय स्थापन करणाऱ्याच्या विचारात आहे. या महाविद्यालयासाठी अभ्यासक्रम ठरविण्यासाठी आणि तज्ञ व्यक्तींची समिती नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांशी चर्चा करावी लागणार करावी लागणार आहे. त्याचबरोबर तज्ञ व्यक्तींच्या समित्या स्थापन कराव्या लागणार असल्याने या समित्यांवरील व्यक्तींची नावे सुचविण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मातोंडकर या अशा व्यक्तींची नावे कला संचालकांकडे करणार असून त्यानंतर त्यासंबधीचा प्रस्ताव संचालकांकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

 प्रस्ताव सादर करताना खालील बाबींचा समावेश राहणार आहे.

  • महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी जागा, इमारत, वसतीगृह, सराव कक्ष, साधनसामुग्री इत्यादी पायाभूत सुविधांचा अभ्यास करून त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे,
  • महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, त्याचा कालावधी, त्यासाठी आवश्यक असणारा अध्यापक वर्ग यांचा अभ्यास करून त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.
  • महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीचा अभ्यास करून शासनाच शिफारस करणे.
  • महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने हाती घ्यावयाच्या कामांचे टप्पे निश्चित करून त्याबाबत सरकारला शिफारस करणे.

याशिवाय आवश्यक असलेल्या गोष्टी समन्वयक म्हणून मातोंडकर यांना अधिकार देण्यात आले आहेत.

Check Also

मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *