Breaking News

विद्यापीठात “सामंतशाही” भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात “सामंतशाही” सुरु आहे. नँक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पध्दतीने कुलसचिवांची नियुक्ती केल्याने त्याचा विद्यापीठाच्या मुल्यांकनावर परिणाम हाईल की काय? इथेही सरकारचा अहंकारच दिसून येतोय, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारच्या कारभार टीका केली.

मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरु असतानाच राज्य शासनाने ८ जानेवारी रोजी अचानक मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची परस्पर नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरुंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही व कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. कुलगुरुंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितल्यावरदेखील सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठांचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटले आहे. मात्र अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरुच ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला आहे, असे गंभीर आरोप त्यांनी केला.

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्ता अशीच धोक्यात आली आहे. उच्च.शिक्षण मंत्री यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते, त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर  युजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सीनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्षे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. त्याला ही विरोध झाला व न्यायालयाने, युजीसीने फटकारल्यानंतर परिक्षा घ्याव्या लागल्या होत्या. ठाकरे सरकारचा हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायत्ता याला इजा करणारे आहे. आता  आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करुन विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या या निर्णयाला आम्ही याला विरोध करतो. आम्ही संघर्ष करु, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

 

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *