Breaking News

मार्केट कॅप आणि कॅपिटलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १ ल्या स्थानावर मार्केट कॅपिटलमध्ये प्रथमच कोट्यावधीवर

मुंबई : प्रतिनिधी

शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल प्रथमच १७ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहेत.  सोमवारी सकाळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल मोठ्या प्रमाणावर वाढले.

समूहाचा विचार करता टाटा समूह सध्या मार्केट कॅपमध्ये सर्वात पुढे आहे.  टाटा समूहातील एकूण २९ लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप शुक्रवार बाजार बंद होताना २३.५२ लाख कोटी रुपये होते. तर रिलायन्स समूहातील १० लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १८.०६ लाख रुपये आहे. एचडीएफसी समूह मार्केट कॅपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या समूहातील ५ लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १५.८७ लाख रुपये आहे. 

चौथ्या क्रमांकावर बजाज समूह आहे. बजाज समूहाचे एकूण मार्केट कॅप ९.३७ लाख कोटी रुपये आहे.  पाचव्या स्थानावर अदानी समूह असून त्यांच्या ६ लिस्टेड कंपन्यांच मार्केट कॅप सध्या ८.८२ लाख कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे सहाव्या नंबरवर इन्फोसिस आहे.  एकट्या इन्फोसिसचे मार्केट कॅप ७ लाख कोटी रुपये आहे. तर आयसीआयसीआय ग्रुपच्या चार लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ६.७६ लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर बिरला ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ५.०९ लाख कोटी रुपये आहे.

मागील आठवड्यात टाटा ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये १.३१ लाख कोटी रुपयाची वाढ झाली. तर रिलायन्सचे मार्केट कॅप १.०१ लाख कोटींनी आणि एचडीएफसी ग्रुपचे मार्केट कॅप १०,१९३ कोटी रुपयांनी वाढले. बजाज ग्रुपचे मार्केट कॅप १६,८५३ कोटी रुपये, अदाणी ग्रुपचे मार्केट कॅप २५,७८२ कोटी, इंफोसिसचे मार्केट कॅप २५ हजार कोटी, आयसीआयसीआय ग्रुपचे ४ हजार कोटी आणि एसबीआय ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये १२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

रिलायन्स ग्रुपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १७ लाख कोटींच्या मार्केट कॅपसह सर्वात मोठी कंपनी आहे. तर एचडीएफसी ग्रुपमध्ये एचडीएफसी बँकेचे ८.८२ लाख कोटीं आणि टाटा ग्रुप मध्ये टीसीएसचे १३.७७ लाख कोटी रुपये मार्केट कॅप आहे. टाटा ग्रुपमध्ये टायटन दुसरी मोठी कंपनी आहे. मागील आठवड्यात टायटनचे मार्केट कॅप प्रथमच २ लाख कोटींच्या वर गेले. आयसीआयसीआय ग्रुप मध्ये आयसीआयसीआय बँक ४.९४ लाख कोटींच्या सर्वात जास्त मार्केट कॅपसह पहिल्या स्थानावर आहे.  अदाणी ग्रुपमध्ये अदाणी ट्रान्समिशनचे सर्वात जास्त मार्केट कॅप १.८१ लाख कोटी रुपये आहे.

Check Also

चित्रपट आणि मनोरंजनास उद्योगाचा दर्जा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *