Breaking News

गुंतवणूक न करता घ्या फ्रॅचायझी, महिन्याला कमवा घशघशीत आधार कार्ड तयार करण्याची फ्रॅचायसीचा घेण्याची संधी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा कठीण काळात नवीन व्यवसाय सुरू करूनही तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत, जिथे काहीच गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू करता येईल.

हा व्यवसाय आधार कार्ड संबंधित आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड महत्वाचं आहे. आधारचा वापर बँक खात्यापासून पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वत्र केला जातो. आधारमध्ये काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UIDAI च्या फ्रँचायझीकडे जावं लागतं. हा फ्रँचायझीचा व्यवसाय तुम्ही करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स घ्यावं लागेल. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया.

आधार कार्ड फ्रँचायझी मिळवायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला UIDAI ने घेतलेली परीक्षा पास करावी लागेल. यानंतर सेवा केंद्र उघडण्यासाठी परवाना दिला जातो. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून नोंदणी करावी लागेल.

असा करावा अर्ज

– आधार फ्रँचाइजी परवाना घेण्यासाठी तुम्हाला NSEIT च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action ला भेट द्यावी लागेल.

– इथं Create New User वर क्लिक करा. क्लिक केल्यावर नवीन फाईल उघडेल.

– यामध्ये तुम्हाला शेअर कोड टाकण्यास सांगितलं जाईल. शेअर कोडसाठी, तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline-kyc ला भेट देऊन ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करावं लागेल.

– डाऊनलोड केल्यानंतर  XML फाइल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड होतील.

– अर्ज करताना तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.

– युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या फोनवर आणि ई-मेल आयडीवर येतील.

– आयडी आणि पासवर्डद्वारे आधार टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनच्या पोर्टलवर सहज लॉग इन करू शकता. यानंतर, Continue चा पर्याय तुमच्या समोर येईल, त्यावर क्लिक करा.

– एक फॉर्म तुमच्या समोर उघडेल. मागितलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर आपला फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा.

– तुम्ही सर्व माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही ते पुन्हा तपासा.

–  त्यानंतर फॉर्म सबमिट करण्यासाठी पुढे जावर क्लिक करून पुढे जाऊ शकता.

पेमेंट करा

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या मेनूवर जाऊन पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल. ज्यामध्ये पेमेंट केल्यानंतर Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. तिथून तुम्हाला चलन पावती डाउनलोड करून ती प्रिंट करावी लागेल.

Check Also

देशांतर्गत ऑटोमोबाईल विक्रीत वाढ इंडियन ऑटोमोबाईल सियाम संघटनेची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) देशांतर्गत उद्योग १२.५ टक्क्यांनी …

One comment

  1. पेमेंट केल्यानंतर चलन प्रिंट काढल्यानंतर पुढे काय करायचे हे सांगा. अर्धवट माहिती देऊ नका. पूर्ण प्रोसेस नीट सांगा किंवा माहितीच देऊ नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *