Breaking News

वरळीत सेनेचा तर मातोश्रीच्या अंगणात काँग्रेस झेंडा वांद्रे पूर्व मध्ये सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे झीशान सिध्दीकी विजयी

मुंबईः प्रतिनिधी
राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा गड राखता आला नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत तेथे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने खरी लढत या दोघांमध्येच झाली. या लढतीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार झीशान सिध्दीकी यांना झाला.
विश्वनाथ महाडेश्वर यांना ३२ हजार६९ मते, तृप्ती सावंत यांना २३ हजार ८५६ मते तर काँग्रेसच्या सिध्दीकी यांनी ३७ हजार ६३६ मते मिळवित विजय मिळविला.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *