Breaking News

भाजपाच्या सभात्यागावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले रिकाम्या बाकड्यांशी काय बोलणार अभिमान वाटणारा महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन

मुंबईः विशेष प्रतिनिधी

मी सभागृहात येताना माझ्यावर दडपण होते. मी मैदानातील माणूस आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर इथल्यापेक्षा मैदानच बरे असे वाटायला लागले. विरोधी बाकावरील सगळ्यांनीच सभात्याग केल्याने मी जे आहे ते समोरासमोर खेळणारा माणूस आहे. या रिकाम्या बाकड्यांशी मी काय सामना करणार असा सवाल करत त्या बाकड्यांशी खेळणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत महापुरूषांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू या असे आश्वासन त्यांनी सभागृहातील सदस्यांना दिले. विश्वासदर्शक ठराव पुकारल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केल्याने त्याचाच मुद्दा धरत त्यांनी वरील वक्तव्य केले.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.

विरोधकांनी शपथविधी घेताना आम्ही घेतलेल्या नावांवर आक्षेप घेतला. मात्र आज आम्ही जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळे, त्यामुळे त्या महापुरूषांची नावे आम्ही शंभरवेळा घेणार असे सांगत आम्ही ज्यांची नावे घेतो अशा महापुरूषांना अभिमान वाटेल असाच महाराष्ट्र घडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलण्यास उठले त्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यापाहून काँग्रेसच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांशी जय शिवराय अशा घोषणा दिल्या.

विश्वासदर्शक ठरावासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीवरील विश्वासदर्शक ठरावावेळचे कामकाज पाहण्यासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे हे विधानसभेच्या प्रेक्षक गँलरीत आवर्जून उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही संसद सदस्यांच्या गँलरीत आवर्जून उपस्थित होते.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *