Breaking News

मराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका

सातारा : प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकविण्यात सध्याचे राज्य सरकार अपयशी ठरल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो असे आवाहन भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करत ती मोठी माणसे आहेत, ते मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळखली जातात त्यांच्याकडून मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचे आरोप प त्यांना या गोष्टी करता आल्या असत्या असा शरद पवारांचे नाव न घेता आरोप केला.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेली अनेक वर्षे मराठा समाज सत्तेत असलेल्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी करीत आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षे झाली प्रलंबित आहे. फडणवीस सत्तेत असताना मराठा आरक्षणाचा विषय रेटून नेतात मग तुम्हाला का ते जमत नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. अनेक वर्षापासून असलेले नेतेच आताही सत्तेत आहेत. त्यांनी हा प्रश्न सोडवावा असे सांगत सध्या कोरोना असल्याने लोक रस्त्यावर उतरत नाहीत. नाही तर समाज यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला.

Check Also

पीओपीच्या मुर्त्या तयार करण्यास अखेर परवानगी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य

मुंबई : प्रतिनिधी पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *