Breaking News

नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिकमध्ये कोणते गुन्हे दाखलः जाणून घ्या शहर शिवसेनेच्या वतीने महामार्गावर निदर्शने

नाशिक -महाडः प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले ते जाणून घेवूया.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याने महाडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. महाड मध्ये मुंबई गोवा महामार्गावर निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोकणातील जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले. यामुळे शिवसेना आणि भाजप असा राजकीय वाद आता निर्माण झाला असून कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाडसह कोकणात सर्वत्र नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या मुखवट्याची गाढवावरून धिंड काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मुंबई गोवा महामार्गावर निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केल्याने राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राणे यांनी मुख्यमंत्री हे लोकसेवक असताना कानाखाली वाजवली असती, अशी भाषा करत मुख्यमंत्र्यांचा अवमान करणे, त्याचप्रमाणे धार्मिक, प्रादेशिक, दहशतीचे वातावरण तयार करणे या कारणास्तव भादंवि कलम १५३ अ (१), (ब), (क), १८९, ५०४, ५०५, (२), ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा
महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. बिपीन म्हामूनकर, जयवंत दळवी, अक्षय ताडफळे यांच्यावर भादंवि कलम १४३, १८८, २६९, २७०, २७१ आणि आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कायदा कलम ५१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक मध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे-
नाशिकमध्ये २४-८-२०२१ रोजी नाशिक शहर शिवसेनेचे अध्यक्ष सुधाकर भिका बडगुजर यांनी भादंवि कलम ५००, ५०५ (२), १५३-ब (१) (क) खाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेबद्दल बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल वक्तव्य केले.
केंद्रीय मंत्री यांचे महाड येथील विधान केल्याने नाशिक शहरातील विविध गटातील सदस्य व व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल, शत्रुत्व व कटूपणाची भावना निर्माण होईल आणि या विधानामुळे सामान्य नागरीक मुख्यमंत्री कुठलेही काम करत असताना जर त्यांचे सचिवांना काहीही विचारले, तर सामान्य नागरीक त्यांचेवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

…ओबीसी व खुल्या वर्गावरचा अन्याय दुसरीकडे भरून काढणार राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे. शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *