Breaking News

‘तू तिथे असावे’ चित्रपटात दोघांच्या स्वप्नांचा प्रवास भूषण आणि पल्लवीची जमली जोडी

मुंबईः प्रतिनिधी

रियल लाइफमधल्या जोड्या नियती जुळवते, पण रील लाइफमधील जोड्या जुळवणं हे नियतीच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या हाती असतं. त्यामुळे कधीही एकत्र काम न केलेले दोन कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र येतात आणि अनाहुतपणे जोडीच्या रूपात प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूषण प्रधानची जोडी आता अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत जमली आहे.

‘तू तिथे असावे’ या आगामी मराठी चित्रपटात भूषण आणि पल्लवी एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट जणू दोघांच्या स्वप्नांचा प्रवासच उलगडणारा आहे. स्वप्नांचा प्रवास कधी एकट्याचा असतो, तर कधी कुणाला सोबत घेऊन. भूषणसुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात त्याच्या जोडीला आहे पल्लवी. ‘तू तिथे असावे’ या मराठी सिनेमात भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या…’ असे बोल असलेल्या प्रेमगीताचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. अनाहुतपणे ओठांवर सजणारं हे गीत तरल प्रेमाची अनुभूती देईल असा विश्वास भूषण व पल्लवीने व्यक्त केला आहे.

चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला बेला शेंडे व स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. दिनेश निंबाळकर यांनी संगीत दिलं आहे तर जीतसिंग यांनी गीताचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाची निर्मिती गणेश पाटील करीत असून दिग्दर्शन संतोष गायकवाड करीत आहेत. भूषण-पल्लवीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत.

Check Also

छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *