Breaking News

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध कोरोनाबाधीत १९ रुग्णांना घरी सोडल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत असे आवाहन करत परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी. तसेच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे:

  • राज्यात सधया १३५ बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले.
  • शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.
  • कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू साहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.
  • राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. कोवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.
  • ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत.
  • बाधीत रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.
  • नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *