Breaking News

याच दिवसाची वाट पहात होते का?… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का? शिवसेना प्रवक्ते खासदार संजय प्रवक्ते यांचा खोचक सवाल

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला.

त्याचबरोबर इस बात पर त्यागपत्र…राजीनामा तो बनता है साहेब.. अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

केंद्राने मनात आणलं असतं तर आज झालेल्या हिंसेला थांबवू शकली असती. झालेल्या प्रकाराचे समर्थन कोणत्याही प्रकारे होवू शकत नाही. तसेच लाल किल्ला आणि तिरंगा ध्वजाचा अपमान कोणीही सहन करू शकत नाही. मात्र तेथील परिस्थिती का बिघडली असा सवाल उपस्थित करत केंद्राने कृषी कायदे का रद्द करत नाही? का कोणती अदृश्य शक्तींचे राजकारण तर सुरु नाही ना असा सवाल करत देशात जे सुरु आहे. ते लोकशाही म्हणून सुरु नसून देशात लोकशाही नाही तर लोकशाहीच्या नावाखाली भलतचं सुरु असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

 

Check Also

पूर परिस्थितीतील मदत आणि गणेशोत्सवासाठी अजून ४० रेल्वे गाड्या रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *