Breaking News

ट्रॅक्टर रॅली: आंदोलनातील घुसखोरांकडून लाल किल्ल्याच्या एका चबुतऱ्यावर झेंडे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसेचे गालबोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मागील दोन महिन्यापासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी आज परवानगी दिली. मात्र रॅलीला सुरुवात झाल्यानंतर आयटीओ येथे आंदोलनातील घुसखोरांनी शहरात जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरीकेड्स तोडत प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग इतरांनीही जात लाल किल्ल्याकडे रवाना झाल्याने आयटीओ येथे आंदोलनकर्त्ये विरूध्द पोलिस अशी परिस्थिती निर्माण झाली. आयटीओपाठोपाठ मुबारका चौक, नांगलोई, अक्षरधाम आदी ठिकाणी हिंसक वातावरण निर्माण झाले. तर लाल किल्याच्या एका चबुतऱ्यावर झेंडा फडकाविल्याने आणि पंतप्रधान फडकावित असलेल्या पाईपवर झेंडा घुसखोरांकडून फडकाविण्यात आला.

आयटीओ येथे शहरात जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरीकेड लावले होते. मात्र काही घुसखोरांनी हे बॅरीकेड तोडत थेट शहराकडे कुच करत लाल किल्ल्याच्या दिशेने गेले. त्यांच्या पाठोपाठ इतरही काही जणांनी लाल किल्ल्याकडे गेले. तेथे थेट या घुसखोरांनी सुरुवातीला पंतप्रधान ज्या ठिकाणी तिरंगा फडकावतात तेथील पाईपवर चढून पहिला झेंडा फडकाविला. त्यावेळी पोलिसांनी सदर घुसखोर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी घुसखोरांनी पुन्हा लाल किल्ल्यात घुसून एका चबुतऱ्यावर एक तर आधी लावलेल्या झेंडाच्या ठिकाणी आणखी एक झेंडा पाईपवर लावण्यात आले.

नांगलोई, मुबारका चौक आणि आयटीओ येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्याना पांगविण्यासाठी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान काही घुसखोरांकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत परिस्थिती आणखी तणावपूर्ण निर्माण केली. त्यामुळे पोलिसांना सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्या घुसखोरांच्या दिशेने सोडाव्या लागल्या.

आयटीओ येथे एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्टंट करताना ट्रॅक्टर पलटल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी फायरींग केल्यानेच त्या आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्याकडून करण्यात येत आहे.

Check Also

औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *