Breaking News

मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांमधील पाणीप्रश्न निकाली निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिली.  निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देत या निर्णयाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी आंध्रप्रदेशशी झालेल्या विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहे, असे गृहीत धरून चर्चा केली जात होती. अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत खूप समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार अगोदरचे ११७.८७ टीएमसी आणि अधिकचे ४४.५४ टीएमसी असे मिळून १६७.४६ टीएमसी पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड  जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार असच्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयाने हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत केल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे तथापी, आंध्र प्रदेशशी झालेल्या विविध बैठकांमध्ये पैनगंगेत ११७.८७ टीएमसी पाणी आहे असे गृहीत धरून चर्चा केली जात होती. अलीकडेच मी मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध होते म्हणून संपूर्ण १६७.४६ टीएमसी पाणी वापर करण्यास मी आज मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यात प्राधान्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तुट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार असल्याचे ते म्हणाले.

वरील मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर/ नियोजन पुस, अरूणावती व उर्ध्वपैनगंगा या प्रकल्पांच्या खालील भागात प्राधान्याने करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार, उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयाच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात राज्य सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *